केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा  (CTET) परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ Central Board Of Secondary Education The CTET exam सीटीईटी परीक्षा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The CTET exam will be conducted in December

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा  (CTET) परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

नवी दिल्ली : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये ती आयोजित करण्यात येणार आहे. सीबीटी अर्थात संगणकाधारित चाचणी (CBT)असं या परीक्षेचं स्वरूप असेल, असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (The Central Board of Secondary Education) स्पष्ट केलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ Central Board Of Secondary Education The CTET exam सीटीईटी परीक्षा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

परीक्षेचे इतर तपशील, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षार्थी, परीक्षा केंद्रं आणि इतर महत्त्वाच्या तारखा ctet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होतील. इच्छुक उमेदवारांनी, अर्ज भरण्यापूर्वी ही सर्व माहिती या संकेतस्थळावरूनच डाऊनलोड करुन काळजीपूर्वक वाचून घ्यावी, अशी सूचना मंडळानं केली आहे.

सामान्य/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना एका पेपरमध्ये बसण्यासाठी 1000 रुपये आणि दोन्ही पेपरमध्ये बसण्यासाठी 1200 रुपये मोजावे लागतील. SC/ST उमेदवारांसाठी एका पेपरसाठी अर्जाची फी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये आहे.

CTET 2021 साठी, एकूण 18,92,276 उमेदवारांनी पेपर 1 साठी नोंदणी केली होती त्यापैकी 14,95,511 उमेदवारांनी हजेरी लावली आणि 4,45,467 परीक्षार्थी पात्र ठरले. दरम्यान, पेपर II साठी 16,62,886 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी 12,78,165 परीक्षार्थी उपस्थित होते आणि 2,20,069 परीक्षार्थी पात्र घोषित झाले होते. ही परीक्षा 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 या कालावधीत CBT मोडमध्ये घेण्यात आली होती.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *