ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचं निधन

Gulabbai Sangamnerkar गुलाबबाई संगमनेरकर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The death of veteran Lavani empress Gulabbai Sangamnerkar

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचं आज पुण्यात वार्धक्यानं निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. लावणीमध्ये आणि त्यातही बैठकीच्या लावणीत त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या लावणी गातांनाच्या अदा आणि गायकी लक्षणीय होती. लता मंगेशकर यांच्या आजोळच्या गोष्टी या अल्बमच्या ध्वनीचित्रफितीत ‘राजसा जवळी जरा बसा’ या लोकप्रिय लावणीवर गुलाबबाईंनी केलेली आदाकारी संस्मरणीय आहे

गुलाबबाईनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लावणी या कलाप्रकारात स्वतःला झोकून दिलं. राज्यभराGulabbai Sangamnerkar गुलाबबाई संगमनेरकर  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar Newsत खेडोपाडी, अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शन वरून कला सादर करून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या.

उमेदीच्या काळात खानदेशात काम केलेल्या गुलाबबाई संगमनेरकर या गेल्या २० वर्षांपासून पुण्यात स्थायिक होत्या. त्यांनी अनेक मुलींना आपली ही कला शिकवली होती.

त्यांचा मुलगाही त्यांची ही परंपरा पुढं चालवत होता. काही वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. लावणी सम्राज्ञी वर्षा संगमनेरकर ही त्यांची मुलगी आहे. गुलाबबाईंना राज्य शासनाच्या २०१८-१९ च्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *