‘मोहित्यांचं वडगाव’ या गावात दीड तास टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय

Shut down TV and mobile phones टीव्ही आणि मोबाइल बंद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The decision to shut down TV and mobile phones for one and a half hours in the village of ‘Mohitya’s Vadgaon’ in Sangli district

सांगली जिल्ह्यातल्या ‘मोहित्यांचं वडगाव’ या गावात दीड तास टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय.

सुमारे दीड महिन्यापासून या उपक्रमाची अंमलबजावणी

Shut down TV and mobile phones टीव्ही आणि मोबाइल बंद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image by https://pixabay.com/

सांगली: मोबाइल आणि टीव्ही वापराचे जसे फायदे आहेत तसेच अतिवापराचे तोटेही आहेत. त्यामुळं याचा सुवर्णमध्य साधत सांगली जिल्ह्यातल्या ‘मोहित्यांचं वडगाव’ या गावानं रोज रात्री ७ ते साडे ८ या दीड तासात टीव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलांचा रात्रीच्या वेळी घरातील टीव्ही (TV ) सुरु असल्यामुळे आणि मोबाईल फोनमुळे (Mobile ) अभ्यास होत नाही किंवा मुलंच टीव्ही तसंच मोबाईल फोनमुळे अभ्यास करत नाहीत. संध्याकाळी सात वाजल्यापासून वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालू असलेल्या मालिका आणि मुलाच्या हातात घरातील व्यक्तींचे हातात येणारे मोबाईल फोन. सोशल मीडिया, WhatsApp , Snapchat याचा परिणाम हा मुलांच्या अभ्यासावर होत होता .

आज प्रत्येक घरात ही समस्या निर्माण झाली आहे. पण यावर उपाय तरी काय काढायचा, मुलांना अभ्यासात कसे गुंतवायचे असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला असतो. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव या गावामधील नागरिकांना देखील ही समस्या सतावत होती. मात्र यावर गावकऱ्यांनी जालीम उपाय शोधला.

कडेगाव तालुक्यातील 3 हजार 105 लोकसंख्येचे गाव असलेल्या मोहित्यांचे वडगावमध्ये आमसभेत मालिका आणि मोबाईल फोनचा मुलांच्या अभ्यासावर होणारा गंभीर परिणाम या विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात आली.

त्यात रात्री सात ते साडेआठ हा दीड तासांचा हा कालावधी नागरिकांनी सर्वानुमते निश्चय केला आणि 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी देखील सुरु झाली. घरातील टीव्ही आणि फोनच रात्री सात ते साडेआठ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला आहे. सुमारे दीड महिन्यापासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.

यावेळेत विद्यार्थी अभ्यास करतात, महिला घरकाम करतात, पुस्तक वाचतात.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *