2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणं हा चलन व्यवस्थापनचा भाग

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास Reserve Bank of India Governor Shaktikant Das Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Shaktikanta Das explains that demonetisation of Rs 2000 notes is a part of currency management

2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणं हा चलन व्यवस्थापनचा भाग असल्याचं शक्तिकांत दास यांचं स्पष्टीकरण

बँकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेतलेल्या आणि खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमेचा डेटा दररोज ठेवण्याचे निर्देश

नवी दिल्ली : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणं हा चलन व्यवस्थापनचा भाग असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास Reserve Bank of India Governor Shaktikant Das Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

भारतीय रिझर्व्ह बँक दीर्घ काळापासून स्वच्छ चलन धोरणाचं पालन करत असून त्यानुसार यापूर्वीही वेळोवेळी विशिष्ट क्रमांकाच्या नोटा चलनातून काढून घेऊन नव्या नोटा जारी केल्या जातात, असंही त्यांनी सांगितलं.

नोटबंदीनंतरच्या काळात चलनाची गरज तातडीनं भागवण्यासाठी प्रामुख्यानं दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. मात्र, आता हा उद्देश पूर्ण झाला असून चलनात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात असल्यामुळे आता दोन हजाराच्या नोटा कमी करण्यात येत आहेत असं ते म्हणाले.

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व बँकांना दिल्या आहेत. नोटा बदलण्यासाठी दिलेल्या ३० सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत दोन हजार रुपयांच्या बहुतांश नोटा सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ३० सप्टेंबरपर्यंत परत येणाऱ्या नोटांच्या संख्येवरून या नोटेबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेतलेल्या आणि खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमेचा डेटा दररोज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

आरबीआयने आज जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या हंगामाचा विचार करता बँकांनी पुरेशी सावलीत प्रतीक्षा जागा आणि पिण्याचे पाणी राखले पाहिजे.

परिपत्रकात, आरबीआयने नमूद केले आहे की काउंटरवर 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा लोकांना नेहमीच्या पद्धतीने प्रदान केली जाईल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *