अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज

अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी यंदा २३ वर्षांपर्यंतचे युवक पात्र Under Agnipath Yojana, youngsters up to 23 years of age are eligible for Agniveer recruitment this year हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The first batch of Agniveer is ready to join the Navy

अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होण्यासाठी सज्जराहुरी येथे लष्करामध्ये अग्नीवीर भरतीसाठी मेळावा Meet for recruitment of Agnee Veers  in the army at Rahuri हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

चिलिका : सोळा आठवड्यांच्या कडक प्रशिक्षणानंतर २७३ महिलांचा समावेश असलेली अग्नी वीरांची पहिली तुकडी सेवेसाठी सज्ज झाली आहे. ओडिशातील आयएनएल चिलिकातील अग्निवारांची पहिली तुकडी नौदलात सेवेसाठी दाखल होत आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांनी 14 जून 2022 रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. भारत सरकारच्या पॅन-इंडिया मेरिट-आधारित अग्निपथ भरती योजनेअंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली.

ओडिशात चिलिका इथं काल झालेल्या दीक्षांत संचलनात सुमारे दोन हजार सहाशे नव्यानं भरती झालेल्या अग्निवीरांनी भाग घेतला. या दीक्षांत संचलन सोहळ्यासाठी नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरीकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धावपटू आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा, भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांच्यासह संरक्षण दलातील अनेक अधिकारी, विशेष निमंत्रित आणि अग्निवीरांचे पालक यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.

या संचलन सोहळ्यात अग्निवीरांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता, . या तरुण अग्निवीरांच्या आत्मविश्वासानं या योजनेबाबत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून एका नवीन अध्यायाचा प्रारंभ त्यांनी केला आहे. ‘

सरकारने पहिल्यांदा घोषणा केली तेव्हा या योजनेला मोठा विरोध झाला होता. पण अग्निवीरांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहता ही विरोधकांना मोठी चपराक बसली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *