जी-२० अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नर्सची’ पहिली बैठक बंगळुरू इथं सुरु

G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

The first meeting of G20 Finance Ministers and Central Bank Governors begins in Bangalore

जी-२० अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नर्सची’ पहिली बैठक बंगळुरू इथं सुरु

जगातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालीच्या रक्षकांनी जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य, आत्मविश्वास आणि विकास आणावा

भारताने त्याच्या डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये अत्यंत सुरक्षित, अत्यंत विश्वासार्ह आणि अत्यंत कार्यक्षम सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत

नवी दिल्ली : जी-२० अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्याजगातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालीच्या रक्षकांनी जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य, आत्मविश्वास आणि विकास आणावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar Newsयांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाखालील देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीला संबोधित केले.

भारताच्या अध्यक्षतेखाली ‘जी-२० अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नर्सची’ पहिली बैठक आज बंगळुरू इथं प्रधानमंत्री मोदी यांच्या बीजभाषणानं सुरु झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपस्थित प्रतिनिधींनी जगातल्या सर्वात कमकुवत गटाला केंद्रस्थानी ठेवून चर्चा करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.भारतीय अर्थव्यवस्था, आणि भविष्याबद्दलचा आशावाद आणि आत्मविश्वास असलेले भारतीय ग्राहक आणि उत्पादकांकडून जगानं प्रेरणा घ्यावी असं ते म्हणाले.

पंतप्रधानांनी भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात तयार केलेल्या जी 20 पाहुण्यांना भारताचे पाथ-ब्रेकिंग डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म, UPI वापरण्याची परवानगी देणऱ्या नवीन प्रणालीबद्दल देखील माहिती दिली. “UPI सारखी उदाहरणे इतर अनेक देशांसाठी आदर्श असू शकतात. आमचा अनुभव जगाला सांगण्यात आम्हाला आनंद आहे आणि यासाठी जी 20 हे एक साधन ठरू शकते”, या शब्दात पंतप्रधानांनी समारोप आपल्या संदेशाचा केला.

सकाळच्या पहिल्या सत्रात जी २० देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रिय बॅंकांचे गर्व्हनरांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी भूषवलं. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २१ व्या शतकातल्या विविधांगी विकासात आपला सहभाग कसा असेल यावर बॅंकांची मतं जाणून घेतली. भविष्यकालीन शहरांसाठी गुंतवणूक करण्याच्या भारताच्या धोरणांनाही त्यांनी अधोरेखित केलं.

दुपारच्या सत्रात आर्थिक क्षेत्र आणि आर्थिक भागीदारी यावर झालं. जी २० बैठकी बरोबरचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दक्षिण कोरियाचे अर्थमंत्री कु क्यांग हो यांच्याशीही जागतिक प्रश्नावर आणि पर्यावरणावर चर्चा केली. त्याआधी सकाळच्या सत्रात त्यांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. या दोन दिवसीय बैठकीत जी-२० सदस्य देशांचे प्रतिनिधी, आमंत्रित व्यक्ती आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे जवळजवळ ५०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. G२० आर्थिक ट्रॅकच्या विविध कार्य प्रवाहांना स्पष्ट आदेश प्रदान करणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे.

दरम्यान, G-२० परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज होत आहे. शहरात सौंदर्यीकरणाची कामं सुरु असून, ही संत्रा नगरी, “टायगर कॅपिटल ऑफ इंडिया” म्हणून जगासमोर यावी, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

औरंगाबाद इथं जी २० देशांच्या महिला प्रतिनिधींची बैठक या २७ आणि २८ तारखेला होणार असून, या प्रतिनिधींचं उद्या शहरात आगमन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शहरात झालेल्या सौंदर्यीकरण कामाची पाहणी केली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *