The general election program of 92 Municipal Councils and 4 Nagar Panchayats in the state announced
राज्यातल्या ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
मुंबई : राज्यातल्या ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २० जुलैला निवडणूक कार्यक्रम जारी करायचा आहे.
२२ जुलै ते २८ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २९ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. मतदान १८ ऑगस्टला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत होईल. १९ ऑगस्टला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील.
या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असून, निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ती कायम राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जे जिल्हे किंवा विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत, त्याठिकाणी तसंच तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा, आणि आवश्यक असेल तर परिस्थितीनुरुप त्यात बदल करावेत असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत.
या निवडणुकांसाठी नामनिर्देषनांची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवायची आहे. त्यासाठी panchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांनी नोंदणी करावी, आणि उमेदवारी अर्ज तसंच प्रतिज्ञापत्रामधे माहिती भरावी, त्यावर स्वाक्षरी करुन निडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेवर दिलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
या निवडणुका सर्वाोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुमती याचिका आणि संलग्न याचिकांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राज्यातल्या ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर”