लोकांनी कल्पनाही न केलेल्या गोष्टी सरकारनं प्रत्यक्षात आणल्या

Information and Broadcasting Minister Shri Anurag Thakur, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News

The government has made things unimaginable to the people

लोकांनी कल्पनाही न केलेल्या गोष्टी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालच्या सरकारनं प्रत्यक्षात आणल्या आहेत – मंत्री अनुराग ठाकूर

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालच्या सरकारनं लोकांनी कल्पनाही न केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणल्या आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी केले आहे.

Information and Broadcasting Minister Shri Anurag Thakur, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या महा जनसंपर्क अभियानांतर्गत ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. गेल्या ९ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणावर लक्ष केंद्रीत केलं आहे. सरकारनं नव्या भारताचा पाया रचला असून कळसापर्यंत पोहोचण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. यापूर्वीचं संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार घोटाळ्यांसाठी ओळखलं जात होतं. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालचं सरकार इमानदारी आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी कारभारासाठी ओळखलं जातं, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. प्रत्येक विदेश दौऱ्यात राहुल गांधी भारताची बदनामी करतात. सैन्य दल चीनबरोबर संघर्ष करत असताना चीनी अधिकाऱ्यांसोबत राहुल गांधी चर्चा करतात असा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारनं ९ वर्षात खेळ आणि खेळाडूंसाठी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या आतापर्यंतच्या सगळ्या मागण्या केंद्र सरकारनं पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या मागणीनुसार FIR दाखल झाला असून तपास सुरू आहे. हा तपास निष्पक्ष होईल आणि त्यानंतर आरोपपत्र दाखल होईल, तोपर्यंत कुस्तीपटूंनी वाट पहावी असं ते म्हणाले. ही सर्व कायदेशीर प्रक्रीया असून कायदा सर्वांसाठी समान असल्याचं ते म्हणाले.

अनुराग ठाकूर यांनी आज सकाळी मुंबईतल्या सिध्दीविनायक मंदिराला भेट दिली. त्यानंतर वास्तुरचनाकार शशी प्रभु, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्यासह विविध मान्यवरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दुपारी मुंबईत व्यापाऱ्यांच्या परिषदेलाही संबोधित केलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *