अतिविशेषता (सुपर स्पेशिअलिटी) पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

The government is making efforts to provide state-of-the-art facilities for livestock treatment – Deputy Chief Minister Ajit Pawar

पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेच्याबाबतीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील अतिविशेषता (सुपर स्पेशिअलिटी) पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, शेळी समूह केंद्र अमरावती जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. मासळी केंद्र देखभालीसाठी रुपये ५० कोटी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पशुसंवर्धन महोत्सवासाठी ४०६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

येत्या काळात सर्व विभागात आवश्यक पदभरती करण्यास वित्त विभागातर्फे परवानगी देण्यात येणार आहे. विकासकामे करतांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

पशुधन विषयक सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

पशुसंवर्धन राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, पशुधन विषयक सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. पुणे परिसरात जवळपास ४७ खाजगी पाळीव प्राणी दवाखाने व ३ सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध असून या मार्फत पशुवैद्यकीय सेवा दिल्या जातात. मात्र त्यांचेकडून आकारले जाणारे शुल्क सर्वसामान्य पशुपालकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या दवाखानाच्या माध्यमातून वाजवी शुल्क आकारुन आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

प्रास्तविकामध्ये पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याची माहिती दिली.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *