The Meteorological Department predicts that a cyclone is likely to form in the Arabian Sea in the next 12 hours
येत्या १२ तासात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : येत्या १२ तासात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. सध्या निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ताशी ११ किलोमीटर वेगानं उत्तरेकडे सरकतो आहे.
हा कमी दाबाचा पट्टा गोव्यापासून साडे ९०० किलोमीटर, मुंबईपासून अकराशे किलोमीटर आणि पोरबंदरपासून सुमारे बाराशे किलोमीटरवर आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होऊ शकतो असं, हवामान विभागानं म्हटलं आहे.
आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव केरळ किनारपट्टीच्या दिशेने वाढत आहे यामुळे सहाजिकच मान्सूनच्या वेगावर याचा परिणाम होईल.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये जरी मान्सूनचं आगमन उशीरा झालं तरी देशाच्या इतर भागात मान्सून उशीरा पोहोचेल असं नाही तसचं देशभरातील एकूण पावसावरही याचा परिणाम होणार नाही असं आय एम डी ने म्हटलं आहे.भारतामध्ये एल निनोची परिस्थिती असूनही नैऋत्य मोसमी हंगामात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा , असल्याचं IMD नं या पूर्वी सांगितलं होतं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com