बहुप्रतिक्षित अहमदनगर ते आष्टी रेल्वे मार्गाचं शुक्रवारी उदघाटन

Railway रेल्वे हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

The much-awaited Ahmednagar to Ashti railway line was inaugurated on Friday

बहुप्रतिक्षित अहमदनगर ते आष्टी रेल्वे मार्गाचं शुक्रवारी उदघाटन

अहमदनगर : अहमदनगर ते आष्टी या रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारपासून रेल्वे धावण्यास सुरुवात होणार आहे. या मार्गावरच्या पहिल्या रेल्वेगाडीचं उद्घाटन येत्या तेवीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे.

Railway रेल्वे हडपसर मराठी बातम्या Hadapsar News
File Photo

अहमदनगर ते आष्टी 67 किलोमीटर अंतर असून या दरम्यान ही रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करणार आहे. यामध्ये प्रथम नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी, धानोरा, कडा आणि आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे अहमदनगर-परळी (जि. बीड) हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आला. मुंडे यांनी या मार्गासाठी मोठे योगदान दिले.

या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गासाठी दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले होते. अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचं काम पूर्ण झालं असून, यामुळे बीड जिल्हा लोह मार्गाने अहमदनगरला जोडला जाणार आहे.

नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुका सुद्धा या रेल्वे मार्गच्या प्रश्नाभोवती फिरताना पाहायला मिळाल्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. अगदी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा झाली होती.

आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड कर्जत, पाटोदा, शिरुर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे-मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसंच व्यापारी वर्ग यांना मुंबई, पुणे, दिल्ली, इंदूर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा फायदा होईल. यामुळे उद्योगधंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *