The new 6-Lane tunnel at Khambatki Ghat on Pune-Satara highways (NH-4) is expected to be completed by March 2023
पुणे-सातारा महामार्गावरील (एनएच-4) खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
नवी दिल्ली : पुणे- सातारा, महामार्गावर खंबाटकी घाटात नव्या सहापदरी बोगद्याचं काम पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल, असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हा बोगदा प्रत्येकी 3 मार्गिकांचा दुहेरी बोगदा असून, त्याची लांबी सहा किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे ९२६ कोटी रुपये असल्याचं, गडकरी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
आपला देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत आहे. संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून समृद्धी उलगडत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची मागणी नव भारत करत आहे असे गडकरी म्हणाले.
बोगद्यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वेळ आणि पैशात बचतीद्वारे थेट लाभ प्रदान करेल असे त्यांनी सांगितले.
पुणे-सातारा आणि सातारा-पुणे हा खंबाटकी घाटमार्गे अनुक्रमे 45 मिनिटे आणि 10-15 मिनिटांचा प्रवास वेळ आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, या प्रवासाचा सरासरी वेळ कमी होऊन 5-10 मिनिटांवर येईल असे गडकरी यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com