The new education policy of the central government is the soul of the country
केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा :
मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
गणपती रंगवा स्पर्धेतील विजेत्या बालकलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
पुणे : माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हा देशाचा आत्मा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
गणेशोत्सव काळात लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघात ‘गणपती रंगवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोथरुड मधील अनेक बाल मित्रांनी सहभाग घेतला. यातील उत्कृष्ट बालकलाकारांना शुभारंभ लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते.
यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शर्वरी जेमेनिस, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. वर्षाताई डहाळे, भाजपा कोथरुड मंडल सरचिटणीस आणि स्पर्धेच्या संयोजिका प्रा.अनुराधा येडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, स्पर्धेचे पर्यवेक्षक रमणबाग शाळेचे सुरेश वरगंटीवार, पत्रकार सचिन जोशी, मूर्तिकार योगेश मालुसरे, व्हिजन शाळेच्या कला शिक्षिका सौ. ज्योत्सना कुंटे, सौ.वैशाली बोडके, सौ.कन्याकुमारी आढाव,भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, पुणे शहर सरचिटणीस अभिजीत राऊत, कोथरुड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, शिवराम मेंगडे, मिताली सावळेकर, कल्याणी खर्डेकर, रामदास गावडे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मा. ना. पाटील म्हणाले की, “आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुकुल शिक्षण पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व होते. या पद्धतीमुळे आपल्या मुलांना सर्व कलांचे शिक्षण मिळत होते. मात्र, ब्रिटिशांनी ही शिक्षण पद्धती मोडीत काढली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कौशल्याभिमुख शिक्षण देणारी ही शिक्षण पद्धत आणली असून, केंद्र सरकारचे हे नवं शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा आहे. ज्यामुळे आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळण्यासह सर्वांगिण विकास होईल.”
ते पुढे म्हणाले की, “आज आपल्या पुणे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत. जी आताच्या तरुण पिढीलाही माहिती नाहीत. त्यामुळे आगामी काळात ही सर्व ठिकाणे शोधून त्यांची नवीन पीढिला ओळख व्हावी, या उद्देशाने लहान मुलांसाठी ‘मामाच्या गावाला जाऊ या!’ नावाने छोटी सहल आयोजित केली जाईल. त्याचप्रमाणे आपली नवीन पीढि संस्कारक्षम घडवी या उद्देशाने मातृवर्गासाठी ‘आईच्या गोष्टी’ ही स्पर्धा आयोजित केली जाईल,” अशी घोषणा ही त्यांनी यावेळी केली.
सिनेअभिनेत्री शर्वरी जेमेनिस म्हणाल्या की, “श्री गणेश ही विद्येच्या देवतेसह ६४ कलांचा अधिपती आहे. प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार दडलेला असतो, आणि ही कलाच त्या माणसाला शेवटपर्यंत साथ देते. त्यामुळे आपल्यातील कला ओळखण्यासाठी एक व्यासपीठ मिळणं अतिशय महत्त्वाचे असतं. त्याची प्रतिमा लहान मुलांनी रंगवावी ही अतिशय अभिनव कल्पना आहे. माननीय दादांसारखे व्यक्तीमत्त्व असे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहेत, ही आपण सर्वांसाठी अतिशय गौरवाची बाबत आहे.”
स्पर्धेच्या संयोजिका आणि शाहू कला क्रीडा अकादमीच्या अध्यक्षा प्रा.अनुराधा येडके यांनी स्पर्धेमागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राज तांबोळी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्विततेसाठी चंद्रकांत पवार, जितेंद्र खरे, शुभदा येडे, शिवाली गरुडकर, आत्मजा पाणेकर, प्रीती पोतदार, नाजनीन शेख, आरती मराठे, अथर्व गरुडकर, मयूर पुरोहित, आर्यन आधवडे, शाज तांबोळी, संस्कृती माझिरे, जुई मुजुमले इत्यादिंनी विशेष सहकार्य केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना पुरोहित हिने केले. तर बिना कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com