आधुनिक भारताच्या उभारणीत नवे शैक्षणिक धोरण अतिशय मोलाची भूमिका बजावेल

Union Minister of State for Education Dr. Subhash Sarkar केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष सरकार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The new education policy will play a very important role in building a modern India

आधुनिक भारताच्या उभारणीत नवे शैक्षणिक धोरण अतिशय मोलाची भूमिका बजावेल

– केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष सरकार

विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे न राहता, नोकरी देणारे व्हावेUnion Minister of State for Education Dr. Subhash Sarkar
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष सरकार
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : 21 व्या शतकातील समर्थ भारताच्या उभारणीत नवीन शैक्षणिक धोरणाचा वाटा फार मोलाचा ठरणार असल्याचे स्पष्ट करतानाच आजच्या विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे न राहता, नोकरी देणारे व्हावे अशी अपेक्षा केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी पुण्यात व्यक्त केली.

पुण्याजवळील पिरंगुट इथल्या पुणे इन्स्टिट्युट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट या संस्थेच्या 13 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संस्थेतील एकंदर 280 जणांना व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी प्रदान करण्यात आली.

आजच्या पदवीदान समारंभात विद्यार्थी जीवनाच्या नवीन पर्वात प्रवेश करीत आहेत अशावेळी उपनिषद , वेद आणि भगवत गीतेतील उपदेश सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज असल्याचे डॉ . सरकार म्हणाले

भारतामध्ये आंतरशाखीय शिक्षणाची पूर्वीपासून परंपरा असून नालंदा आणि तक्षशिला ही त्याची उदाहरणे आहेत, असे मंत्री म्हणाले.

वेद आणि उपनिषदाबरोबरच श्रुती, शास्त्र, महाभारत, रामायण, योग, आयुर्वेद या साऱ्यांनी प्राचीन भारताला वैभवशाली बनवले आहे. नवीन शैक्षिणक धोरणामध्ये नेमका तोच धागा पकडून विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात उच्च शिक्षणाला जास्त उपयोगी आणि गुणवत्ता पूर्ण बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळेच आधुनिक भारताच्या उभारणीत हे नवे शैक्षणिक धोरण अतिशय मोलाची भूमिका बजावणार असल्याचे डॉ . सरकार यांनी सांगितले .

स्वयंपूर्ण भारताच्या निर्मितीच्या दृष्टीने आज आपण वेगाने वाटचाल करीत असताना तुमची गुणवत्ता समाजाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी कशी उपयोगात आणता येईल याचा प्राधान्याने विचार होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे व्हायला हवे आणि शिक्षण संस्थांनी देखील त्या पद्धतीचे प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण दिले पाहिजे अशी अपेक्षा सरकार यांनी यावेळी व्यक्त केली. उच्च दर्जाचे यश प्राप्त करण्यासाठी कठोर त्याग करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे आणि हीच आपल्या प्राचीन ग्रंथांची शिकवण देखील आहे असे मंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्र्यांनी सर्वांना आपला परिसर हा प्लॅस्टिकमुक्त परिसर करण्याचे आवाहन देखील केले.

संस्थेचे अध्यक्ष रमण प्रीत यांनी संस्थेच्या भावी वाटचालीविषयी माहिती दिली. संचालक भारत भूषण सिंह यांनी प्रास्ताविक केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *