नवीन संसद भवनाचं उद्घाटन येत्या रविवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

The new Parliament building नवीन संसद भवन हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The new Parliament building will be inaugurated by the Prime Minister on Sunday

नवीन संसद भवनाचं उद्घाटन येत्या रविवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात ऐतिहासिक आणि पवित्र “सेंगोल” ची स्थापना करतील

हे पवित्र”सेंगोल” ब्रिटिशांकडून भारताकडे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

या ऐतिहासिक “सेंगोल” साठी संसद भवन हे सर्वात योग्य आणि पवित्र ठिकाण आहे – अमित शाह

नवी दिल्ली : दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन येत्या रविवारी २८ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते.The new Parliament building
नवीन संसद भवन
हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम वेळेआधी पूर्ण झालं आहे. या इमारतीसाठी राबणाऱ्या कामगारांचा सत्कार प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी नव्या संसद भवनाच राष्ट्रार्पण करणार आहेत. या प्रसंगी लोकसभा सभापतींच्या आसनाशेजारी ऐतिहासिक महत्वाच्या सुवर्ण राजदंडाची ते प्रतिष्ठापना करतील.

या राजदंडाचा म्हणजेच सेंगोल चा वापर पहिल्यांदा १४ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांकडून भारताकडे सत्ता हस्तांतरित करताना देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी केला होता.

या रात्री जवाहरलाल नेहरू यांनी खास या कार्यक्रमासाठी आलेले तामिळनाडूतील तिरुवदुथुराई आधिनम (मठ) च्या आधिनमो (पुजारी) यांच्याकडून ‘सेंगोल’ स्वीकारले. हा तोच क्षण होता जेव्हा ब्रिटिशांनी भारतीयांच्या हाती सत्ता हस्तांतरित केली होती. आपण स्वातंत्र्य म्हणून जे साजरे करत आहोत ते खरे तर ‘सेंगोल’ सुपूर्द करण्याच्या क्षणाने चिन्हांकित झाले आहे.

गृहमंत्र्यांनी सेंगोलबद्दल अधिक माहिती देताना सांगितले “सेंगोलचा अर्थ गहन आहे,तमिळ शब्द “सेम्माई” वरून तो घेतला आहे, ज्याचा अर्थ “नीतिपरायणता” असा आहे.

तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठाच्या मुख्य पुजाऱ्यांचा त्याला आशीर्वाद लाभला आहे. “न्याया ” कडे अविचल नजरेने पाहणारा नंदी शीर्षस्थानी हाताने कोरलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा “आदेश ” (तमिळमध्ये “आणई”) असतो , हे सर्वात महत्वाचे आहे, लोकांच्या सेवेसाठी निवडून आलेल्यांनी हे कधीही विसरू नये.”1947 पासूनचे तेच सेंगोल पंतप्रधान लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाजवळ ठळकपणे स्थापित करतील. संपूर्ण राष्ट्राला ते पाहता यावे यासाठी ते प्रदर्शित केले जाईल आणि विशेष प्रसंगी बाहेर आणले जाईल.

सेंगोलबद्दल अधिक माहिती आणि डाउनलोड करण्यायोग्य व्हिडिओ असलेल्या एका विशेष संकेतस्थळाचे (sengol1947.ignca.gov.in) आज या कार्यक्रमात गृहमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ते म्हणाले, “भारतातील लोकांनी हे पाहावे आणि या ऐतिहासिक घटनेबद्दल जाणून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.”

नूतन संसद भवन म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीचं एक उदाहरण असून हे संसद भवन विक्रमी वेळेत बांधणाऱ्या सुमारे साठ हजार कामगारांना प्रधानमंत्री या राष्ट्रार्पणाच्या समारंभात सन्मानित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नूतन संसद भवनाच्या राष्ट्रार्पणप्रसंगी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं असल्याचंही त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. पवित्र राजदंड सेंगोल ची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाच उदघाटनही त्यांनी यावेळी केलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *