The night landing facility started at Kolhapur airport today
कोल्हापूर विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु
कोल्हापूर: विमानतळांचे अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठीच्या सुविधा उभारणे ही सतत सुरु राहणारी प्रक्रिया असून जमिनीची उपलब्धता, व्यावसायिक व्यवहार्यता, आर्थिक-सामाजिक विचारप्रवाह, वाहतुकीच्या दृष्टीने गरज तसेच या विमानतळांवरील आवागमनाबाबत विमान कंपन्यांची इच्छा यांच्या अनुकुलतेनुसार एएआय (Airports Authority of India) अर्थात विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ परिचालक यांच्यातर्फे ही कामे हाती घेतली जातात.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळ परिसरात रात्रीच्या वेळी विमाने उतरविण्यासाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचे काम हाती घेतले होते. डीजीसीए (Directorate General of Civil Aviation (DGCA) )अर्थात नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयाच्या पथकाने 10 जून 2022 रोजी विमानतळाचे परिक्षण केले होते. या परिक्षणादरम्यान डीजीसीएने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार नियम पालनाबाबत प्राधिकरणाने या आधीच कार्यवाही सुरु केली होती.
कोल्हापूर विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे. त्यामुळे विमानतळ विकासाच्या प्रकियेतला महत्वाचा टप्पा पार होणार आहे.
नाईट लँडिंग सुविधा कार्यरत करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. राज्य सरकारनं जागा उपलब्ध करून दिल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरच्या धावपट्टीचं विस्तारीकरण केलं आहे. विस्तारीकरणानंतर धावपट्टी १ हजार ७८० मीटर झाली आहे. या धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
धावपट्टीवर मार्किंगही केलं आहे. आजपासून विस्तारित धावपट्टी पूर्ण क्षमतेनं वापरता येणार आहे.कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डींगचं कामही वेगानं सुरु असून येत्या ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “कोल्हापूर विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु”