शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची सुविधा सुरू

Shirdi International Air Port

The night landing facility started at Shirdi airport

शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची सुविधा सुरूShirdi International Air Port

शिर्डी: शिर्डी आंतरराष्ट्रीय विमातळावरून ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली होती. या विमानसेवेने ३ जानेवारी २०२२ रोजी १० लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला.

हे लक्ष्य संपादन करताना शिर्डी विमानतळावर जवळपास १३ हजार विमान उड्डाणांची नोंद करण्यात आली. टाळेबंदीमुळे मागील काही महिने शिर्डी विमानतळ बंद होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी विमानतळावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरवण्याची सुविधा कालपासून सुरू झाली. नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शिर्डी विमानतळाला रात्री विमान उतरवण्यास परवानगी दिली होती.

त्यानुसार काल रात्री प्रथमच ८ वाजून १० मिनिटांच्या सुमाराला शिर्डी विमानतळावर उतरवण्यात आलं. नवी दिल्ली इथून सोडण्यात आलेल्या इंडिगो कंपनीच्या या विमानात २११ प्रवासी होते. हेच विमान रात्री ९ वाजता पुन्हा दिल्लीला रवाना झालं.

या यशस्वी प्रवासानंतर येत्या १५ ते २० दिवसात रात्रीची विमानसेवा नियमितपणे सुरु होण्याची अपेक्षा विमानतळ सूत्रांनी व्यक्त केली आहे. रात्री विमान उतरवण्याच्या सोयीमुळे भाविकांना शिर्डीचा प्रवास एका दिवसात करता येणं शक्य होणार आहे.

राज्यात पुणे, मुंबई, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिर्डी हे चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ आहे. शिर्डी विमानतळावर स्पाइस जेट, इंडिगो एअरलाईन्सची सेवा दिल्ली – हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणांसाठी सुरु करण्यात आली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *