The opposition parties demand that the development works started by the Maha Vikas Aghadi government should not be suspended.
महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये, विरोधी पक्षांची मागणी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली.
अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई तसंच अन्य मदतीचे तातडीने देण्यात यावी, आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
अतिवृष्टीनं मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना १0 लाखाची मदत द्यावी, पावसामुळं नुकसान झालेल्या जिरायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५0 हजार रुपये आणि बागायती शेतकऱ्यांना १ लाख रुपयाची प्राथमिक मदत देण्याची मागणी काँग्रेसनं आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-भाजपा सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थिगिती दिली आहे.
या मागणीविषयी बोलताना सरसकट कामांपेक्षा आवश्यक असलेल्या कामांना आम्ही मान्यता देऊ. अगोदरच्या सरकारने शेवटच्या काळात बजेटची उपलब्धता न पाहता, बजेटपेक्षा पाच पटीने अधिक निधीचे वाटप केले. अर्थातच याबाबतचे निर्णय रद्द करावे लागतील. ते कायम ठेवता येणार नाहीत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com