The picture in Baramati will change in the upcoming Lok Sabha elections – Chandrasekhar Bawankule
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील चित्र बदलल्याचं दिसेल- चंद्रशेखर बावनकुळे
बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील चित्र बदलल्याचं आपल्याला दिसेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीत बोलताना व्यक्त केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी आज बारामतीत भेट देऊन पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आगामी सर्व निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या लढवणार असल्याची घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली.
ही नवीन युती राज्यात 2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं.
सीतारमण या पाच ते सहा वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात येणार
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पूर्णवेळ बाकामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी आहेत. पुढच्या 18 महिन्यात सीतारमण या पाच ते सहा वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत. प्रत्येक वेळी त्या तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणची विकासाची काय स्थिती आहे. केंद्राकडून काय विकासाची अपेक्षा आहे, राज्य सरकारकडून या ठिकाणी काय करता येईल याचा आढावा त्या घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. गरिब कल्याणाच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांचा देखील सीतारमण आढावा घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
शरद पवारांनी मोट बांधली किंवा कितीही प्रयत्न केले तरी देशाचे विश्वागुरु मोदीच आहेत. मजबूत भारत करण्याचं मोदींचं व्हिजन आहे. व्हिजन ठेवून काम करणाऱ्यांमागेच जनता राहते. बाकीचे लोक राजकीय व्हिजन ठेवतात, असंही ते म्हणाले.
बारामतीत कोण उमेदवार द्यायचा हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. आताची निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहोत. कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना तयारी करावी लागते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदीच येतील. आतापर्यंत बारामतीत जी लढत झाली नाही. त्यापेक्षा जोरदार लढत होईल. देशातले अनेक गड उद्ध्वस्त झालेत. संघटन मजबूत झाल्यानंतर गड उद्ध्वस्त होतात. कुणाचा गड राहणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com