महाराष्ट्रातला राजकीय पेचप्रसंग अद्याप कायम

Hadapsar News Vidhan Bhavan, Mumbai Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

The political crisis in Maharashtra still persists

महाराष्ट्रातला राजकीय पेचप्रसंग अद्याप कायम

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक आज सकाळी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली.Hadapsar News Vidhan Bhavan, Mumbai Hadapsar News

या बैठकीनंतर पक्षाचे वरीष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील राजकीय घडामोडींना हाताळण्यासाठी शिवसेना जे प्रयत्न करेल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल, असं पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

दरम्यान, शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांच्या नियुक्ती केल्याचं पत्र एकनाथ शिंदे यांनी सादर केलं होतं, त्यावरच्या काही आमदारांच्या सह्यांबाबत प्रशनचिन्ह उपस्थित झालं असून, त्या सर्वांची शहानिशा केली जाईल, असं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं.

एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधीमंडळ पक्षप्रमुखपदी म्हणून कायम ठेवण्याची ३४ बंडखोर आमदारांची मागणी
महाविकास आघाडी सरकारमधली शिवसेनेची घुसमट आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ तत्वांशी होणारी तडजोड मान्य नसल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३४ आमदारांच्या स्वाक्षरीचे दोन प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सादर करण्यात आले.

एकनाथ शिंदे यांना १४ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या शिवसेना विधीमंडळ पक्षप्रमुखपदी म्हणून कायम ठेवावं. तसंच मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड तात्काळ रद्द करून त्या जागी भरत गोगोवले यांची निवड करावी, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदार संघातल्या मतदारांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. तसंच वैचारिक दृष्ट्या विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी केल्यामुळे मतदारांमध्येही रोष आहे, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आग्रही

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर, एकनाथ शिंदे यांनी, पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक असल्याचं ट्वीट केलं आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचं, शिवसेनेचं मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे. असं त्यांनी म्हटलंय.

शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या स्वाक्षरीचे दोन प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सादर

शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या स्वाक्षरीचे दोन प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सादर करण्यात आले. एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधीमंडळ पक्षप्रमुखपदी म्हणून कायम ठेवावं तसंच मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड तत्काळ रद्द करून त्या जागी भरत गोगोवले यांची निवड करावी, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *