The possibility of an unconventional war in the future – Defense Minister
भविष्यात अपारंपरिक पद्धतीने युद्ध होण्याची शक्यता – संरक्षण मंत्री
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे 18 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत भारतीय लष्कराचा सर्वोच्च पातळीवरील द्वैवार्षिक उपक्रम असलेली लष्कर कमांडरांची परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पातळीवरील नेते विद्यमान संरक्षणविषयक परिस्थिती, तटवर्ती क्षेत्रातील आणि सीमाभागातील स्थिती, आणि सध्याच्या संरक्षण विषयक बंदोबस्तविषयक आव्हानांच्या सर्व पैलूंबाबत विचार विनिमय करत आहेत. तसेच या परिषदेत, संस्थात्मक पुनर्रचना, वाहतुकीची सोय, प्रशासन, मनुष्यबळ विकास, स्वदेशीकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरण, महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचा वापर आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामांचे मूल्यमापन या मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
उत्तरेकडच्या सीमांवरचा तणाव कमी करण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे. आपले लष्कर ठामपणे उभं असल्यानं सध्या सुरू असलेल्या शांतता चर्चा सुरू राहतील असं ते म्हणाले. पश्चिमकडच्या सीमांवर घुसखोरीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.
लष्करी कमांडरांच्या परिषदेत ते बोलत होते. सध्या निर्माण झालेल्या आणि जगातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीच्या जागतिक परिस्थितीकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “आगामी काळातील युद्धांमध्ये मिश्र प्रकारच्या युद्धांसह अपारंपरिक आणि असमान युद्धस्थिती असणार आहे. सायबर, माहिती, संपर्क, व्यापार आणि वित्त हे भविष्यातील संघर्षांचे अविभाज्य भाग असणार आहेत.
त्यामुळे, सशस्त्र दलांना त्यांच्या कार्याचे नियोजन आणि धोरणे निश्चित करताना या सर्व बाबी लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.”
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या नवनव्या प्रगतीचं आणि लष्करात त्याच्या होत असलेल्या वापराचं त्यांनी कौतुक केलं.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या नवनव्या प्रगतीचं आणि लष्करात त्याच्या होत असलेल्या वापराचं त्यांनी कौतुक केलं.