The ranking of educational institutions in the country has been announced
देशातल्या शैक्षणिकसंस्थांची मानांकनं जाहीर
IIT मद्रास 2022 च्या भारत क्रमवारीत अव्वल, IISC-बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर
नवी दिल्ली : देशातल्या शैक्षणिकसंस्थांची मानांकनं आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ही सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था ठरली आहे. आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच बरोबर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू हे भारतातील रँकिंग-2022 मधील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे, ज्याची आज नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली.
क्रमवारीनुसार, आयआयएम, अहमदाबाद ही देशातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था असून त्यानंतर आयआयएम, बंगलोर आणि आयआयएम, कलकत्ता आहे.
AIIMS, नवी दिल्ली हे सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय स्थान मिळवलं आहे आणि चेन्नईतील सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस हे सर्वोत्तम दंत महाविद्यालय ठरले आहे. आयआयटी, मद्रास हे सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्यानंतर आयआयटी, दिल्ली आणि आयआयटी, बॉम्बे यांचा क्रमांक लागतो.
मिरांडा हाऊस, दिल्ली हे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आहे, त्यानंतर हिंदू महाविद्यालय, दिल्ली आणि प्रेसिडेन्सी महाविद्यालय, चेन्नई आहे. जामिया हमदर्द ही देशातील सर्वोत्तम फार्मसी संस्था आहे.
मानांकांत महाराष्ट्र
विविध प्रकारातल्या उत्कृष्टता क्रमवारीत राज्यातल्या मुंबई, पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठासह २२ संस्थांनी स्थान मिळवलं आहे.
मुंबईची रसायन तंत्रज्ञन संस्था अठ्ठाविसाव्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय शिक्षण संस्थांमधे वर्ध्याची दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था आणि कराडचं कृष्णा आयुर्विज्ञान संस्था या अभिमत विद्यापीठाला मानांकन मिळालं आहे.
कायद्याचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमधे पुण्याचं सिम्बायॉसिस लॉ-स्कूल तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय नागपूरची विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था, डी वाय पाटील विद्यापीठ, यांना मानांकन मिळालं आहे. महाविद्यालय गटात पुण्याचं फर्गसन, आणि मुंबईची निर्मला निकेतन आणि संत झेवियर ही महाविद्यालयं पहिल्या १०० क्रमांकांमधे आहेत.
यावेळी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, २१ वे शतक हे ज्ञान आणि नवनिर्मितीचे शतक असेल. ते म्हणाले की, नवोपक्रम आणि उद्योजकता राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क, NIRF आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, NAAC चा भाग असेल. श्री प्रधान म्हणाले की सर्व संस्थांना मान्यता आणि क्रमवारी या दोन चौकटीत यावे लागेल.
उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल, यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, राष्ट्रीय मान्यता मंडळाचे अध्यक्ष के. के. अग्रवाल, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष निर्मलजीत सिंग कलसी यावेळी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com