The report of the Chandiwal Commission investigating the allegations against Anil Deshmukh has been submitted to the Chief Minister
अनिल देशमुख यांच्या यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगानं आज आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला.
देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्याला आरोपांची चौकशी करण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यात न्यायमूर्ती, निवृत्त के. यू. चांदीवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जवळजवळ वर्षभर चाललेल्या चौकशी दरम्यान आयोगानं अनिल देशमुख यांच्यासह बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि अन्य काही जणांचा जवाब नोंदवला.
या काळात परमवीर सिंग आयोगासमोर एकदा हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिलेल्या माहितीशिवाय अन्य कुठलीही माहिती आपल्याकडे नसल्याचं शपथपत्र सादर केलं होतं.
पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या हॉटेल आणि बार मालकांकडून दर महा १०० कोटी रुपये जमा करावेत असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप त्यांनी या पत्रामधून केला होता. या आरोपांबाबत सीबीआय आणि ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय देखील तपास करत आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी एप्रिल २०२१ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत
हडपसर न्यूज ब्युरो