The result of the 12th exam was declared and girls beat this year too
बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर, निकाल घटला,
मुलींनी यंदाही मारली बाजी
पुणे विभागाचा निकाल ९३ पूर्णांक ३४ शतांश टक्के
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते.
यावर्षीचा राज्याचा सरासरी निकाल ९१.२५ शतांश टक्के लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये मुलींचं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा ४ पूर्णांक ५९ शतांश टक्क्यांहून अधिक आहे.
या वर्षी एकूण १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात सर्वाधिक ९६ टक्क्यांहून अधिक निकाल लागल्यानं कोकण विभागानं बाजी मारली आहे.
पुणे विभागाचा निकाल ९३ पूर्णांक ३४ शतांश टक्के, नागपूर विभागाचा निकाल ९० पूर्णांक ३५ शतांश टक्के, औरंगाबाद विभागाचा निकाल ९१ पूर्णांक ८५ शतांश टक्के, मुंबई विभागाचा निकाल ८८ पूर्णांक १३ शतांश टक्के, कोल्हापूर विभागाचा ९३ पूर्णांक २८ शतांश टक्के लागला आहे.. तर अमरावती विभागाचा निकाल ९२ पूर्णक ७५ शतांश टक्के, नाशिक विभागाचा निकाल ९१ पूर्णांक ६६ शतांश टक्के, लातूर जिल्ह्याचा निकाल ९० पूर्णांक ३७ शतांश टक्के इतका लागला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन पद्धतीनं निकाल mahresult.nic.in आणि hsc.mahresults.org.in या वेबसाइटवर पाहता येईल
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com