Thirteen people died after the roof of a well in a temple collapsed in Indore
इंदूर इथं मंदिरातल्या विहीरीचं छत कोसळल्यानं १३ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशात इंदूर इथं बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू
इंदूर: मध्य प्रदेशात इंदूर इथं बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातल्या विहीरीचं छत कोसळल्यानं १३ जणांचा मृत्यू झाला. आज कन्या पुजनाच्या निमीत्तानं मोठ्या संख्येनं महिला या मंदिरात आल्या होत्या. यावेळी सुरू असलेल्या विधींदरम्यान अनेक जण या विहीरीच्या छतावर बसले होते. मात्र त्यांच्या वजनाचा भार जास्त झाल्यानं, छत कोसळलं आणि छतावर बसलेले अनेक जण विहीरीत पडले. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी इलैया राजा टीआर, आयुक्त पवन शर्मा यांच्यासह वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले.
जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकानं बचाव कार्य सुरू केलं असून, आत्तापर्यंत १७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
इंदूरमधील दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासोबत चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
राज्य सरकार वेगानं मदत आणि बचाव कार्य करत आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे, आपण बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंदूरमधील दुर्दैवी दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com