Everyone should carry forward the ‘Satya Shodhak’ movement in their own way
प्रत्येकाने सत्यशोधक चळवळ आपापल्या परीने पुढे न्यावी
विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांचे मत
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आजच्या काळाचा संदर्भ लावताना आजही त्यांचे मूलभूत विचार हे कालसुसंगत आहेत, पुढील हजारो वर्षही राहतील यात शंका नाही. त्यांच्या सत्यशोधक चळवळीला आपण सर्वांनीच आपापल्या परीने पुढे नेण्याची गरज असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ’ या विषयावर जी. ए.उगले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात डॉ.सोनवणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ.विजय खरे, महात्मा ज्योतिबा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ.विश्वनाथ शिंदे , अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विलास आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.संजीव सोनवणे म्हणाले, आमच्या घरातील व्यक्तींचे दशक्रिया विधी आम्ही सत्यशोधक पद्धतीने केले असून आमच्या छोट्याश्या गावात अनेक जण याच पद्धतीने विधी करतात. प्रत्येकजण आपापल्या पातळीवर ही चळवळ पुढे नेत आहे हीच खरी महात्मा फुले यांना आदरांजली आहे असेही डॉ.सोनवणे यावेळी म्हणाले.
जी. ए.उगले म्हणाले, स्त्री, वंचित समाज आणि बहुजन या त्रिकोनासाठी सत्यशोधक समाज उभा आहे. सर्व पुरोगामी विचारांची आद्य संस्था म्हणून सत्यशोधक समाजाकडे पाहायला हवे असेही जी.ए.उगले यावेळी म्हणाले.
यावेळी विश्वनाथ शिंदे यांनी सत्यशोधक समाजाचे यंदा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्त या वर्षात अनेक कार्यक्रम घेण्याचा मानस आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com