शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह सादर

Uddhav Thackeray Eknath Shinde उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The Shinde group submitted three symbols to the Election Commission

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह सादर

मुंबई : अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड, या चिन्हांचा समावेश आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव द्यायला यापूर्वीच निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. Uddhav Thackeray Eknath Shinde उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं नाव, तसंच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. मात्र, निवडणूक चिन्हासाठी त्यांनी दिलेले तिन्ही पर्याय निवडणूक आयोगानं  फेटाळले असून, त्यांना नव्यानं तीन पर्याय द्यायला सांगितलं आहे. उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना हे पर्याय द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मिळालेल्या ‘मशाल’ या चिन्हाचं औरंगाबाद इथल्या शिवसैनिकांनी स्वागत केलं आहे. शहरातल्या क्रांतीचौक इथं पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी हातात मशाल घेऊन रॅली काढली आणि मशालीचं पूजन केलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *