राज्यातील नोंदणीकृत परिचारिकांची कमतरता प्रशिक्षणाद्वारे भरुन काढणार

The Nurse परिचारिका हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

The shortage of registered nurses in the state will be filled through training

राज्यातील नोंदणीकृत परिचारिकांची कमतरता प्रशिक्षणाद्वारे भरुन काढणार

राज्यातील नोंदणीकृत परिचारिकांची कमतरता प्रशिक्षणाद्वारे भरुन काढण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघनटेच्या पुणे शाखेचा पुढाकार

The Nurse परिचारिका  हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,
Image by AIR

पुणे: राज्यामध्ये रुग्णालयातील खाटांच्या प्रमाणात नोंदणीकृत परिचारिका उपलब्ध होत नाहीत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.

त्यातून मार्ग काढण्यासाठी रुग्णालयातील कार्यरत परंतु अपात्र परिचारिकांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पुणे शाखेनं घेतली आहे अशी माहिती आयएमए पुणेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी दिली आहे.

राज्याच्या नर्सिंग काउंसिलकडे नोंदणीकृत परिचारिकाच रुग्णालयात रुग्णसेवेसाठी असली पाहिजे. त्याची नोंद महापालिकेकडे केली पाहिजे. तरच, रुग्णालयाच्या नोंदणीचं नूतनीकरण होईल, असा कायदा राज्य सरकारनं यापूर्वी केला आहे.

मात्र, रुग्णालयातील खाटांच्या प्रमाणात नोंदणीकृत परिचारिका उपलब्ध नाहीत. त्यामुळं रुग्णालयातील वैद्यकीय सेवेपुढं समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे परिचारिकांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी आयएमएनं घेतली आहे असं डॉक्टर संजय पाटील म्हणाले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *