The situation in the Jehangirpuri area of Delhi is under control today
दिल्लीतल्या जहांगीरपुरी भागातली परिस्थिती आज नियंत्रणात
नवी दिल्ली : दिल्लीतल्या जहांगीरपुरी भागातली परिस्थिती आज नियंत्रणात आहे अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली आहे.
दोन धार्मिक गटात वाद झाल्यामुळे काल या भागात तणाव निर्माण झाला होता. जहांगीरपुरीसह इतर संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तुकड्या तैनात केल्याचंही त्यांनी सांगितलं.
अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा अस्थाना यांनी दिला आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं.
या भागातली परिस्थिती नियंत्रणाखाली असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोहल्ला कमिट्यांची बैठक घेत असल्याचं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलं.
या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल याना याबाबतच्या चर्चेत सांगितलं.
Hadapsar News Bureau.