जीएसटी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरनं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

GST Council Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

The spontaneous response of traders to the bandh called by Maharashtra Chamber to repeal GST on pulses and pulses

डाळी आणि कडधान्यांवर लावलेला जीएसटी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरनं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जीएसटी रद्द न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार – महाराष्ट्र चेंबरGST Council Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

मुंबई : अन्नधान्य व पॅकबंद खाद्यपदार्थांवर सोमवारपासून (दि. १८) आकारण्यात येणाऱ्या पाच टक्के ‘जीएसटी’विरोधात घाऊक व किरकोळ धान्य-किराणा व्यापाऱ्यांनी शनिवारी (दि. १६) पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्र शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी महाराष्ट्र चेंबरने आंदोलन सुरू केले आहे.

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील बहुतांश किराणा दुकाने बंद असल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली. जीएसटी कौन्सिलने नॉनब्रॅण्डेड धान्य व काही पॅकबंद खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर पूर्वी जीएसटी आकारला जात नव्हता.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सन २०१७ मध्ये जीएसटी प्रणाली लागू करताना अन्नधान्यावर कर लावणार नाही, असे आश्वासन दिले होते. नंतर ब्रॅण्डेड अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर व आता नॉनब्रॅण्डेड अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला.

आधीच महागाई वाढत असताना, या निर्णयामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडणार आहे. अन्नधान्यासह दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर, ताक, मुरमुरे, गूळ, पापड यासारखे दैनंदिन गरजेचे पदार्थ महागणार आहेत. यामुळे छोटे व्यापारी मोडीत निघणार असून, फक्त मोठ्या कंपन्यांचा व्यापार वाढणार आहे, असे महाराष्ट्र चेंबरचे म्हणणे आहे.

मुंबई, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, धुळे औरंगाबाद आदींसह सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जीएसटी आयुक्त यांना व्यापारी शिष्टमंडळांनी निवेदन देऊन अन्नधान्यावरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी केली आहे.

लवकरात लवकर हा प्रश्न केंद्र सरकारने निकाली काढावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत या मागणीला सरकारने लवकर दाद न दिल्यास अन्नधान्य व खाद्यपदार्थ व्यतिरिक्त अन्य व्यापारी सुद्धा आंदोलनात उतरतील व आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल

शनिवारी हा बऱ्याच जणांसाठी सुट्टीचा दिवस असल्याने त्यानिमित्त शहरात किराणा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले.

केंद्र सरकारनं धान्य, डाळी आणि कडधान्यांवर लावलेला पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरनं शनिवारी पुकारलेल्या बंदला राज्यातल्या व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जळगाव शहरातील दाणा बाजारातही कडकडतीत बंद पाळला होता.  बुलडाणा जिल्ह्यातही व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. खामगाव इथल्या शेतकरी, व्यापाऱ्यांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठवलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “जीएसटी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरनं पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *