It is necessary to think whether the statement made by Sanjay Raut was about the legislature or about a specific group
संजय राऊत यांनी केलेलं विधान विधिमंडळाबाबत होतं की विशिष्ट गटाबद्दल होतं याचा विचार होणं आवश्यक
राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी केलेलं विधान विधिमंडळाबाबत होतं की विशिष्ट गटाबद्दल होतं याचा विचार होणं आवश्यक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
मुंबई : राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी केलेलं विधान विधिमंडळाबाबत होतं की विशिष्ट गटाबद्दल होतं याचा विचार होणं आवश्यक आहे. त्यादृष्टीनं हक्कभंग समितीतले सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे. आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत व्यक्त केले आहे.
कोल्हापुरात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचे मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. यावर विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे. संजय राऊत यांचे विधान ऐकले असता त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो असेही शरद पवार म्हणाले. खासदार संजय राऊत यांचे हे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे.
गठीत केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही. हे योग्य नाही. ज्या सदस्यांनी सभागृहात हक्कभंगाची मागणी केली, राऊत यांच्यावर कडक कारवाईची आग्रही मागणी केली त्या सदस्यांचा हक्कभंग समितीत समावेश झाला. हे म्हणजे तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले.. तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com