राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस

Pension Scheme Image हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Today is the seventh day of the strike called by the state government employees

राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस

२००५ पूर्वी नोकरीत रुजू झालेल्या तसंच जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होवून विनाकारण प्रशासनाला वेठीस धरु नये
Pension Scheme Image हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
Image :- https://www.business-standard.com/

मुंबई : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर ‘गगनभेदी थाळीनाद आंदोलन’ करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आज हे आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात परवा काळा दिवस पाळण्यात येणार असल्याची माहिती संपकरी संघटनांनी दिली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाची झळ शालेय विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या वागदे आणि भिरवंडे गावानं विद्यार्थ्यांना स्वतः शिकवाण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांमधले डी.एड., बी.एड. झालेले विद्यार्थी शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत.

या संपामुळं सोलापूर जिल्ह्यातली शासकीय यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळं रुग्णांचं आणि शाळकरी मुलांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय कर्मचार्‍यांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा जिल्हा प्रशासनानं काढला आहे.

प्रशासनानं महसूल विभागातल्या कर्मचार्‍यांना नोटीसाही बजावल्या आहेत. २००५ पूर्वी नोकरीत रुजू झालेल्या तसंच जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होवून विनाकारण प्रशासनाला वेठीस धरु नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे.

एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारनं तात्पुरता पर्याय दिला असून शेतकऱ्यांनी पाठवलेल्या मोबाईल छायाचित्राचीही नोंद घेण्यात येईल असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. यासाठी मोबाईल क्रमांक आणि लँडलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये ही छायाचित्र ग्राह्य धरली जातील असं सत्तार यांनी सांगितलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *