The success of Savitribai Phule Pune University students in the national level research competition Anveshan
अन्वेषण या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे यश
पुणे : राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अन्वेषण या संशोधन विषयक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. आरोग्यशास्त्र व संबंधित विषय तसेच औषधनिर्माणशास्त्र व पोषण या या गटात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली आणि अकॅडमी ऑफ मेरिटाईम एज्युकेशन अँड ट्रेनिंग अभिमत विद्यापीठ चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० व ११ मार्च २०२२ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यापीठातील गार्गी निकम, अमेय गावसकर, फैयाज मुजावर यांच्या गटाला प्रथम क्रमांकाचे पहिल्या क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
हॅलोबेटिक या प्रकल्पाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी डायबेटिक जखमेसाठी एक नाविन्यपूर्ण ड्रेसिंग प्रकार साकारला आहे. या विद्यार्थ्यांना एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील प्राध्यापक डॉ. राहुल पाडळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
हे विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्न एआयएसएसएमएस इंजिनिअरिंग महाविद्यालयात फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी या महाविद्यालयाने पारितोषिक पटकावले आहे.
Hadapsar News Bureau.