The Supreme Court has refused to hear the petition seeking disqualification of MLAs
आमदारांना अपात्र ठरवण्या संदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्या संदर्भात शिवसेनेने दाखल केलेल्या ताज्या याचिकेवर तातडीने
सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठानं आज हा आदेश दिला. येत्या ११ जुलैला मुख्य याचिकेवर सुनावणी ठेवली आहे.
एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना त्यांच्या पात्रतेविषयीचा निर्णय येईपर्यंत सभागृहातून निवलंबित करण्यात यावं अशी याचिका शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली होती.
एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदारांना अपात्रतेविषयीच्या नोटीसला उत्तर देण्याकरता १२ जुलैपर्यंतची मुदत न्यायालयानं दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com