The University Grants Commission will soon allow students to take 2 full-time courses at the same time
विद्यापीठ अनुदान आयोग लवकरच विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पूर्णवेळ अभ्यासक्रम करण्याची परवानगी देणार.
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पूर्णवेळ पदव्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम घेण्याची परवानगी विद्यापीठ अनुदान आयोग देणार आहे. आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी झालेल्या दृकश्राव्य बैठकीत ही घोषणा केली. विद्यार्थी एकाच विद्यापीठातून अथवा भिन्न विद्यापीठांमधून एकाच वेळी दोन शैक्षणिक अभ्यासक्रम करू शकतात.
तसंच एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीनं दोन शैक्षणिक अभ्यासक्रमही करू शकतात,यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान आत्मसात करायला बळ मिळेल,असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अनेक घटक देशभरात लागू करण्यात येतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत लवचिकता प्रदान करण्याचा आयोग प्रयत्न करत आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वं लवकरच लागू होतील, असं आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau.