Government is capable of dealing with the situation arising from the variant BF7 of Covid-19
कोविड १९ चा व्हेरिएंट बीएफ ७ मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे
– डॉ.भारती पवार
पुद्दुचेरी : कोविड १९ चा व्हेरिएंट बीएफ ७ या नवीन विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी पुद्दुचेरी इथं केलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पवार यांनी पद्दुचेरीतल्या हॉटेलमध्ये नागरिकांबरोबर ऐकला. त्यानंतर त्या बोलत होत्या.
पवार यांनी पुढं सांगितलं की, बीएफ ७ विषाणूचा जपान, चीन आणि काही अन्य देशांमध्ये झपाट्यानं प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी बैठक घेत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्याचंही पवार यांनी सांगितलं.
आतापर्यंत देशात बीएफ ७ विषाणूचे चार रुग्ण आढळल्याचं पवार यांनी सांगितलं. देशात लसीकरण मोहीम अधिक व्यापकपणे राबवली जाणार आहे. तसंच कोणतीही आणिबाणीची स्थिती हाताळण्यासाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल,असं त्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com