The Vitthal Temple in Pandharpur is now open for 24 hours darshan
पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर आता चोविस तास दर्शनासाठी खुले
पंढरपूर : साठी राज्यभरातून विविध साधू संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे येत आहेत. सध्या राज्याच्या सर्वच भागात मान्सूनच्या पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने यावर्षी आषाढीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ४ ते २२ जुलै दरम्यान भाविकांना दर्शनासाठी विठ्ठल मंदिर चोविस तास तास खुलं राहणार आहे. तर ३ जुलै पासून ऑनलाईन दर्शन सुविधा काही दिवसांसाठी बंद केली जाणार आहे.
देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. परंपरेनुसार विठ्ठलाच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आला. तर विठ्ठलाच्या पाठी मऊमुलायम तक्या ठेवण्यात आला आहे. आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल रखुमाईचं दर्शन हे भाविकांसाठी २४ तास खुलं असणार आहे.
दरम्यान कोरोनापश्चात दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येनं वारकरी येतील असा अंदाज आहे. त्याअनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तयारी केली आहे. दररोज १ लाखांहून अधिक भाविकांना विठूरायाचं दर्शन सुरळीत घेता यावं यासाठी मंदिर समितीनं दर्शन रांगेची उभारणी केली आहे.
राज्यातील राजकीय महानाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. याबाबतची माहिती देखील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदा आषाढी वारीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर समितीनं निमंत्रण दिलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा होणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com