सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी विधानसभेत संमत

विधान भवन मुंबई , महाराष्ट्र Vidhan Bhavan-Mumbai-Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The vote of confidence in the government was passed in the Legislative Assembly by 164 votes to 99

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी विधानसभेत संमत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र  विधानमंडळाचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन रविवारपासून मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी  विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार व भरतशेठ गोगावले यांनी नियम २३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करणारा हा प्रस्ताव होता.

विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मतविभागणी घेण्यात आली, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते मिळाल्याने त्यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, असे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. या प्रस्तावाच्या बाजूने १६४ तर प्रस्तावाच्या विरोधात ९९ सदस्यांनी मतदान केले, तर ३ सदस्य तटस्थ राहिले.विधान भवन मुंबई , महाराष्ट्र Vidhan Bhavan-Mumbai-Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

शिंदे गटात कालच सामिल झालेले हिंगोलीतल्या कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं. समाजवादी पार्टीचे २ आणि एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह २० सदस्य मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित होते. त्यात काँग्रेसच्या १० आमदारांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे विश्वासदर्शक ठरावामध्ये विरोधकांची संख्या तिहेरी आकड्यापर्यंतही पोहचू शकली नाही. याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्तावाचं भाषण करताना काँग्रेसच्या काही आमदारांनी अप्रत्यक्षपणे या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याचा इशारा करत या ‘बाहेरुन मदत केलेल्यांचे’ आभार मानले.

शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये बोलाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री’ असा केलाय. यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना भाजपा युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.

विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यावर यातले काही सदस्य सभागृहात दाखल झाले. विश्वासदर्शक ठरावानंतर शिवसेनेच्या ४० सदस्यांनी पक्षादेश पाळला नसल्याचा मुद्दा मुख्य प्रतोद सुनिल प्रभु यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यावर हे सगळं सभागृहाच्या पटलावर असल्याचं सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *