जग जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे : डब्ल्यूटीओ प्रमुख

World Trade Organization जागतिक व्यापार संघटना मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The world is heading towards a global recession: WTO (World Trade Organization) chief

जग जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे : डब्ल्यूटीओ (World Trade Organization) प्रमुख

जग मंदीच्या दिशेनं वाटचाल करत असल्यानं विकासाची वाटचाल कायम ठेवता येईल अशी धोरणं आखण्याचं जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांचं आवाहन

जिनिव्हा : रशियाआणि युक्रेनमधलं युद्ध, हवामानविषयक संकट, अन्नधान्यांच्या वाढत्या किमती, उर्जा संकट आणि कोरोना महामारीनंतरचे दुष्परीणाम या एकामागोमाग आलेल्या संकटांच्या मालिकांमुळे जग मंदीच्या दिशेनं वाटचाल करत आहे, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक नगोझी ओकोनझो इवेयाला यांनी दिला आहे.World Trade Organization जागतिक व्यापार संघटना मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

नगोझी यांनी आज स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं सुरु असलेल्या जागतिक व्यापारी संघटनेच्या वार्षिक सभेला संबोधित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकासदर घसरेल अशी व्यक्त केलेली शक्यता आणि व्यापारविषयक निर्देशकांची निराशजनक कामगिरी ही वस्तुस्थिती आहे, अशावेळी संभाव्य मंदीच्या पार्श्वभूमीवर आपण विकासची वाटचाल कायम ठेवता येईल अशी धोरणं आखायला हवीत असं, जगभरातील देशांच्या केंद्रीय बँकांनी महामाईमागच्या मागणी आणि पुरवठ्याशी संबंधीत नेमक्या कारणांचा शोध घ्यावा आणि उपाययोजना कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं.

नायजेरियनचे माजी वित्त आणि परराष्ट्र मंत्री म्हणाल्या की मध्यवर्ती बँका एक कठीण स्थानावर आहेत, पुढे मार्गावर फारसा पर्याय नाही. महागाई मजबूत मागणीमुळे होत आहे किंवा किमतीतील वाढ पुरवठा बाजूच्या स्ट्रक्चरल समस्यांशी संबंधित आहे की नाही हे ठरवण्यासाठी केंद्रीय बँकांच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *