महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसून सरकार विकासाकरता नियोजनबद्ध काम करत आहे – मुख्यमंत्री

There are no differences in the Mahavikas Aghadi and the government is doing planned work for development – Chief Minister

महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसून सरकार विकासाकरता नियोजनबद्ध काम करत आहे – मुख्यमंत्री

मुंबई: राज्य सरकारमध्ये कुठलेही रुसवे-फुगवे नाहीत आणि महाविकास आघाडी विकासासाठी नियोजनबद्ध काम करत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.

Chief Minister Uddhav Thackeray. Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

मुंबईत वडाळा इथं वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे झालं. ही वास्तू २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल.त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

ही पर्यावरणपूरक वास्तू असून इमारतीचं संकल्पचित्र अप्रतिम आहे, हे काम बघितल्यावर कटुता निर्माण करणाऱ्यांना नक्की उत्तर मिळेल, असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा आहे,  या कर संकलनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाच राज्य ठरलं आहे, ही अभिमानाची बाब आहे, असं त्यांनी सांगितलं.

कायदा सुव्यवस्था चोख राखणाऱ्या पोलीस खात्याच्या अनेक सुविधांचं लोकार्पणही आज त्यांच्या हस्ते झालं. मराठी अस्मितेचं प्रतीक असलेल्या चर्नीरोड इथल्या मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन त्यांनी केलं.

मराठी भाषेत खूप ताकद आहे आणि कार्यालयीन कामकाजासाठी या प्रादेशिक भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, असं मुख्यमंत्री मराठी भाषा भवनाचं भूमिपू़जन केल्यानंतर बोलत होते. तसंच मराठी भाषेत अवघड शब्दांचा वापर टाळला पाहिजे जेणेकरून ती सामान्य माणसांना समजेल, असंही ते म्हणाले.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *