महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाही

Congress state president Nana Patole. हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

There is no difference regarding seat allocation in Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाही

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नसल्याचं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं स्पष्टिकरण

जागा वाटपासंदर्भातहोणाऱ्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा केली जाईलCongress state president Nana Patole. हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी, संजय राऊत यांच्या विधानावरून काँग्रेस व शिवसेनेमध्ये झालेली शाब्दिक चकमक या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकेल की नाही, अशी चर्चा होती. विशेषत: भाजप व शिंदे गटाकडून याबाबत वक्तव्य केली जात होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळीच माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर आघाडीतले घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून ज्या प्रकारे काँग्रेसच्या लोकांना प्रवेश देणे सुरू आहे ते योग्य नाही. आमचे जे उमेदवार त्यांनी पक्षात घेतले आहेत ते परत दया अशी आमची भूमिका असेल अन्यथा त्या जागेवर आमचा दावा असेल अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.

ते सध्या सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज पंढरपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. जागा वाटपासंदर्भातहोणाऱ्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

गेल्या तीन वर्षात आघाडीनं भाजपाला धूळ चारत मोठं यश मिळवलेलं आहे, असं ते म्हणाले. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे. या मतदारसंघातून गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहील, असं त्यांनी सांगितलं.

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ताकदीनं उभा राहत आहे, जिल्ह्यात कोणताही गट-तट नाही, सर्वजण एकसंधपणे काम करत आहेत. तरुणही मोठ्या संख्येनं काँग्रेस पक्षात सहभागी होत असून जनतेच्या आशीर्वादानं जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा चांगली कामगिरी करेल, असंही पटोले यांनी सांगितलं.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *