कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या २ मात्रा घेतलेल्यांना कोर्बेव्हॅक्स लसीची वर्धक मात्रा घेता येणार

Those who have taken 2 doses of Covishield or Covacin will be able to take an additional dose of the Corbevax vaccine.

कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिनच्या २ मात्रा घेतलेल्यांना कोर्बेव्हॅक्स लसीची वर्धक मात्रा घेता येणार

नवी दिल्ली  :   बायोलॉजिकल ई या कंपनीची कोविड-१९ वरील लस कोर्बेव्हॅक्स, १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी वर्धक मात्रेकरिता मंजूर करण्यात आली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधितCOVID-19 vaccination-हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News. वापरासाठी कोवॅक्सिन किंवा कोविशील्डच्या प्राथमिक दोन मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना ही लस दिली जाऊ शकते. यामुळे कोर्बेवॅक्स भारतातील पहिली विषम कोविड वर्धक मात्रा बनली आहे.

बायोलॉजिकल ईच्या व्यवस्थापकीय संचालक महिमा दतला यांनी काल एका निवेदनात सांगितलं की, या मंजुरीमुळे सर्वांना आनंद झाला असून, भारतातील कोविड-१९ बूस्टर मात्रेची आवश्यकता यामुळे पूर्ण होईल.

या मान्यतेद्वारे पुन्हा एकदा कोर्बेवॅक्सची जागतिक दर्जाची स्थायी सुरक्षितता मानकं आणि उच्च प्रतिकारशक्ती सिद्ध झाली आहे. औषध नियामक डीसीजीआय (DCGI) ने एप्रिलच्या अखेरीस ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी कोर्बेवॅक्सला आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली होती.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *