अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका

Threat of terrorism in Asia and Africa due to modern technology -Dr S. Jaishankar अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका -डॉ. एस. जयशंकर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Threat of terrorism in Asia and Africa due to modern technology -Dr. S. Jaishankar

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका -डॉ. एस. जयशंकर

जगभरात मानवविरहीत ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा धोका

समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी इंटरनेटचा वापर

नवी दिल्ली : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका वाढत चालला आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थांसमोरही नवीन आव्हानं उभी रहात असल्याचं मत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीत आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज व्यक्त केलं.Threat of terrorism in Asia and Africa due to modern technology -Dr S. Jaishankar अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका -डॉ. एस. जयशंकर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा उपयोग’ या विषयावर ते बोलत होते. दहशतवादाचं मोठं संकट मानवतेवर आहे. आभासी खासगी यंत्रणा, आभासी चलन, सांकेतिक संदेश यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर दहशतवादासाठी केला जात आहे. यामुळे सरकार आणि संबंधित यंत्रणांसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याबद्दल जयशंकर यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

तसंच दहशतवादी संघटना मानवविरहीत ड्रोनचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्यानं सुरक्षा यंंत्रणांना धोका निर्माण झाला आहे. या तंत्रज्ञानाचा खर्च खूप कमी आहे आणि ते सहजरित्या उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. ड्रोनच्या मदतीनं दशदवादी हल्ले, ड्रग्जची तस्करी केली जात असल्याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधलं. दहशतवादी संघटना ड्रोनच्या मदतीनं आफ्रिकेतील सुरक्षा बल आणि संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दहशतवादी संघटना समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कट्टरता पसरवण्यासाठी केला जात आहे. तसेच कारस्थान रचण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान सर्वांना सहजरित्या उपलब्ध आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचीही क्षमता वाढली आहे. याचा वापर करून दहशतवादी अगदी सहजरित्या हल्ला करू शकतात.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा भारत अध्यक्ष असून या कार्यकाळात दहशतवाद विरोधी मोहिमेला प्राधान्य दिलं जात आहे. सुरक्षा परिषदेतर्फे यासाठी विशेष प्रणाली विकसीत करणार असल्याचंही डॉ. जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *