Threats of cyber and information warfare are major challenges – Defense Minister Rajnath Singh
सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं
– संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली: सायबर हल्ले आणि माहितीविषयक युद्धासारख्या नव्याने उदयाला येत असलेल्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे.
देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेमधली दरी कमी होत असून, सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
दिल्लीतल्या नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या दीक्षांत समारंभात आज बोलताना सिंग म्हणाले की, देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित नसणे हे अत्यंत चिंताजनक आहे असे सांगून संरक्षणमंत्री म्हणाले की, उर्जा, वाहतूक, सरकारी सेवा, दूरसंचार, महत्त्वाचे निर्मिती उद्योग आणि एकमेकांशी जोडलेल्या आर्थिक यंत्रणा यांसारखी क्षेत्रे अशा धोक्यांचे लक्ष्य ठरू शकतात .
माहितीचे युध्द देशातील राजकीय स्थैर्यासमोर गंभीर आव्हान निर्माण करू शकते असे मत त्यांनी मांडले. समाज माध्यमे तसेच इतर ऑनलाईन साहित्य निर्मिती मंचांचा सुसंघटीत वापर जनसामान्यांची मते आणि दृष्टीकोन तयार करण्याला कारणीभूत ठरतात याकडे त्यांनी निर्देश केला.
माहिती युद्धाच्या आव्हानावर, संरक्षण मंत्री म्हणाले की, देशाच्या राजकीय स्थिरतेला धोका निर्माण होण्याची संभाव्यता आहे. ते म्हणाले की सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर संघटित जनतेचं मत किंवा त्यांचा वैचारिक दृष्टीकोन बदलण्यास प्रभावी ठरत आहे.
सर्वांसाठी उपयुक्त अशी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा असा विचार करण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षेकडे खऱ्या अर्थाने सामूहिक दायित्व म्हणून पाहण्याची गरज आहे, यावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी भर दिला.
“शून्य गोळाबेरजेचा खेळ म्हणून राष्ट्रीय सुरक्षिततेचा विचार करता येणार नाही. सर्वांसाठी विजयी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण संकुचित स्वार्थाच्या मार्गाने जाता कामा नये कारण ते दीर्घकाळासाठी फारसे लाभदायक ठरत नाही. शाश्वत तसेच धक्क्यांप्रती लवचिक अशा प्रबुद्ध स्वहिताच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करायला हवी,” ते म्हणाले.
एनडीसीचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की हे अधिकारी म्हणजे भारत आणि उर्वरित जग यांना जोडणारा पूल आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com