हायड्रोजन एनर्जी सिस्टीम ‘ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा

Savitribai Phule Pune Universiy

Three day workshop on ‘Hydrogen Energy System’

हायड्रोजन एनर्जी सिस्टीम ‘ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर एनर्जी स्टडीज तर्फे आयोजन: नावनोंदणी सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर एनर्जी स्टडीज आणि दानव ग्रीन टेक सर्व्हिसेस यांच्यातर्फे ‘हायड्रोजन एनर्जी सिस्टीम ‘ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. Savitribai Phule Pune University

विद्यापीठातील एनर्जी स्टडीज केंद्रात ही कार्यशाळा दिनांक १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणार असून संशोधन संस्थांमधील तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

विज्ञान आणि अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून हायड्रोजन सेक्टर मधील विषयातील करीयरच्या संधी, संशोधन क्षेत्रातील संधी, नवीन माहिती मिळण्यास मदत होईल.

विद्यार्थ्यांना या विषयातील सखोल माहिती, विविध संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यशाळेतील व्याख्यानांचे नियोजन केले आहे. कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर सहभागींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे असे सेंटरकडून सांगण्यात आले.

या कार्यशाळेसाठी ऑनलाईन पूर्वनोंदणी आवश्यक असून ही कार्यशाळा प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांसाठी सशुल्क आहे. यासाठी निवडक ३० जागा असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे याचे प्रवेश केले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी एनर्जी स्टडीज केंद्रातील सहायक प्रा.डॉ.अनघा पाठक ९८२३०२१०६६ व डॉ.एस.पी. देनाव ९५४५६४८४९६ यांच्याशी संपर्क करावा असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

नोंदणी : https://forms.gle/pCT48miw8aYmy2HL9

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *