Thrill of Bomb War at Ahmednagar’s KK Range
अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये बॉम्ब युद्धाचा थरार
अहमदनगर : बॉम्बचा बेछूट मारा करत धुळीच्या लोटातून वाट काढणारे रणगाडे, शत्रूच्या बंकरचा अचूक वेध घेणारे मिसाइल, हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूवर तुटून पडणारे पायदळाचे जवान, ‘टी-९०’ आणि ‘टी- ७२’ अशा विविध रणगाड्यांतून सुरू असणारा बॉम्बचा मारा असा युद्धाचा थरार अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये आज पहायला मिळाला.
भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटर अँड स्कुल आणि कवचित कोअर सेंटर अँड स्कूल यांच्या वतीनं ही प्रात्यक्षिकं आयोजित करण्यात आली होती.
नेपाळचे लष्करी अधिकारी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.
यानिमित्त लष्कराच्या ताकदीचं दर्शन उपस्थितांना झालं. शत्रुचे बंकर नष्ट केल्यानंतर तिरंगा फडकवण्यात आला. तसंच युद्ध सरावाचं आयोजन करण्यामागचा उद्देश लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com