जागतिक बाजारपेठ काबिज करण्याची हीच योग्य वेळ

The Minister for Commerce & Industry, Textiles, Consumer Affairs and Food & Public Distribution, Shri Piyush Goyal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Now is the right time to capture the global market – Piyush Goyal

जागतिक बाजारपेठ काबिज करण्याची हीच योग्य वेळ आहे

– पियुष गोयल

तांत्रिक वस्त्रोद्योग २०४७ सालापर्यंत १२५ अब्ज डॉलरवर जाईल- पियुष गोयल

The Minister for Commerce & Industry, Textiles, Consumer Affairs and Food & Public Distribution, Shri Piyush Goyal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

मुंबई : तांत्रिक वस्त्रोद्योग २०४७ सालापर्यंत १२५ अब्ज डॉलर वर जाईल असं केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. भारतीय वस्त्रोद्योगाने आता, आपली व्याप्ती गुणवत्ता, गती आणि उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. टेक्नोटेक्स 2023: भारतीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योगाची @2047 पर्यंतची प्रगती’ या प्रमुख सत्रात ते बोलत होते.

“वृद्धी, गती आणि उत्पादन वाढवून, जागतिक बाजारपेठ काबिज करण्याची हीच योग्य वेळ”

जागतिक बाजारपेठ काबिज करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.”आता आपण आपली व्याप्ती वाढवायला हवी आणि अधिक सर्वसमावेशक प्रकल्प उभारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून, जगभरातील कॉर्पोरेट खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम होऊ शकू.

जर आपण विकासाचा वेग वाढवला तर हा उद्योग २०० अब्ज डॉलर वरही जाऊ शकेल असंही ते म्हणाले. तांत्रिक वस्त्रोद्योग हा भविष्यकाळातल्या व्यवसाय असून त्यात मोठ्या संधी आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

आपल्या कारागिरांनी आणि विणकरांनी बनवलेली वस्त्र उत्पादने भेटवस्तू म्हणून देण्याचा विचार करावा, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी उपस्थितांना केले. तांत्रिक वस्त्रोद्योगातील सात बीआयएस मानकांचा संच आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींवरील ज्ञान अहवालाचे प्रकाशनही त्यांनी यावेळी केले.

पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या सहकारी संस्था, आस्थापना आणि नव्यानं सुरु होत असलेल्या उद्योजकांना त्यांनी या क्षेत्रात कार्यरत होण्याचं आवाहनही यावेळी केलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *