Hindu Janajagruti Samiti demands to file charges against those guilty of financial misconduct in Tuljapur temple
तुळजापूरच्या मंदिरात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवी मंदिरात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीनं केली आहे. १९९१ ते २००९ या काळात दानपेटी लिलावात ८ कोटी, ४५ लाख, ९७ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचं गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीच्या चौकशी अहवालात स्पष्ट झालं होतं.
यामध्ये ९ लिलावदार, ५ तहसिलदार, १ लेखापरिक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. या अहवालास पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्यानं हिंदु जनजागृती समितीनं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याप्रकरणी न्यायालयीन लढाही देणार असल्याचं समितीचे पदाधिकारी राजन बुणगे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
हडपसर न्युज ब्युरो