पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी आणखी एक संधी

Linking of PAN card with Aadhaar is mandatory पॅनकार्डचं आधारशी संलग्नीकरण अनिवार्य हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Another opportunity to link PAN card with Aadhaar card

पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी आणखी एक संधी

पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी काय करावं ?

माझे आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही हे मी कसे तपासू शकतो?

पॅन कार्ड लिंक न केल्यास ते रद्द मानले जाईल.Linking of PAN card with Aadhaar is mandatory पॅनकार्डचं आधारशी संलग्नीकरण अनिवार्य हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : करदात्यांना पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठीची आणखी काही वेळ देण्यात आली आहे. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी 30 जून, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, ज्याद्वारे करदाते परिणामांना सामोरे न जाता आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करण्यासाठी विहित प्राधिकरणाला त्यांचे आधारकार्ड सूचित करू शकतात. याबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.

अद्याप पॅन-आधार लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करा. कारण ही तुमची शेवटची संधी असू शकते. यानंतर पॅन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली जाणार नाही.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN Card -Aadhaar Card link) करणे खूप महत्वाचे आहे. पण अद्याप अनेक लोकांनी ते लिंक केलेले नाही. मात्र, आता दंड भरून लिंक करण्याची सुविधा सरकारने दिली आहे.

प्राप्तिकर कायदा, 1961 (‘कायदा’) च्या तरतुदींनुसार 1 जुलै, 2017 रोजी पॅनकार्ड वाटप करण्यात आलेल्या आणि आधारकार्ड क्रमांक मिळवण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विहित प्राधिकरणाला त्याचे आधारकार्ड सूचित करणे आवश्यक आहे.

मात्र आता. पॅन आणि आधार लिंक करण्याच्या उद्देशाने विहित प्राधिकरणाला आधारकार्डची माहिती देण्याची तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

1 जुलै, 2023 पासून, आवश्यकतेनुसार, आधारकार्ड सूचित करण्यात अयशस्वी झालेल्या करदात्यांचं पॅनकार्ड निष्क्रिय होईल आणि पॅनकार्ड निष्क्रिय राहण्याच्या कालावधीत त्याचे परिणाम खालीलप्रमाणे असतील:

  • अशा पॅनसाठी कोणताही परतावा दिला जाणार नाही
  • ज्या कालावधीत पॅन निष्क्रिय राहते त्या कालावधीसाठी अशा परताव्यावर व्याज देय होणार नाही
  • TDS आणि TCS जास्त दराने कापले जातील/संकलित केले जातील, कायद्यात प्रदान केल्याप्रमाणे
  • 1,000 रुपये शुल्क भरल्यानंतर विहित प्राधिकरणाला आधारकार्डची माहिती दिल्यानंतर 30 दिवसांत पॅनकार्ड पुन्हा सुरू करता येईल.

ज्या व्यक्तींना पॅन-आधार जोडणीमधून सूट देण्यात आली आहे त्यांना वर नमूद केलेले परिणाम लागू होणार नाहीत.

या श्रेणीमध्ये विशिष्ट निर्देशित राज्यांमध्ये राहणारे, कायद्यानुसार अनिवासी, भारताचे नागरिक नसलेली व्यक्ती किंवा मागील वर्षात कोणत्याही वेळी ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो.

पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी काय करावं ?

आतापर्यंत 51 कोटींहून अधिक पॅनकार्ड आधारकार्डशी जोडले गेले आहेत.

खालील लिंकवर प्रवेश करून पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले जाऊ शकते.  तुमच्या स्मार्टफोनवरूनही  पॅनकार्ड आधारकार्डशी (Aadhaar-PAN ) लिंक करता येईल.  https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar 

हे जर शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रावर जाऊन ते करू शकता.

माझे आधार कार्ड पॅनशी लिंक आहे की नाही हे मी कसे तपासू शकतो?

आधार-पॅन कार्ड आधीपासूनच लिंक आहे की नाही हे तुम्ही https://eportal.incometax.gov.in/iec या वेबसाइटवर लॉग इन करून पाहू शकता.

येथे Link Aadhaar वर जाऊन Our Services वर क्लिक करा.

आता Link Aadhaar Know About Your Aadhaar Pan Linking Status वर क्लिक करा, हे केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.

या पेजवर तुम्हाला PAN Card आणि Aadhar Card शी संबंधित माहिती भरावी लागेल. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर View Link Aadhaar Status वर क्लिक करा. हे केल्यानंतर तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक आहे की नाही याचे माहिती मिळेल.

पॅन कार्ड लिंक न केल्यास ते रद्द मानले जाईल.

पॅन कार्ड लिंक न केल्यास ते रद्द मानले जाईल. याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात पुन्हा वापरू शकणार नाही. आयटी रिटर्न भरण्यापासून ते रिफंड जारी करण्यापर्यंत तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. तसेच बँकिंग आणि इतर कामे करू शकणार नाहीत. .

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *