रीड-इंडिया च्या धर्तीवर रीड-महाराष्ट्र चळवळ सुरू करणार

Minister Deepak Kesarkar मंत्री दीपक केसरकर हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

To promote the reading culture, Read-Maharashtra will launch a movement on the lines of Read-India

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी रीड-इंडिया च्या धर्तीवर रीड-महाराष्ट्र चळवळ सुरू करणार

अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर
– शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरMinister Deepak Kesarkar मंत्री दीपक केसरकर हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : वाचन संस्कृती वाढीला लागावी यासाठी रिड -इंडिया च्या धर्तीवर रिड -महाराष्ट्र चळवळ पुढच्या वर्षीपासून सुरू करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये ‘पुस्तक पेटी’ ही संकल्पनाही पुढच्या वर्षीपासून राबवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन आणि अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

ग्रंथपालांची रिक्त पदं भरून अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचं समायोजन करण्यासंदर्भातला तारांकित प्रश्न भाजपाचे रामदास आंबटकर यांनी विचारला होता, त्याला केसरकर उत्तर देत होते.

ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे त्या दोन पेक्षा अधिक शाळांसाठी एकत्रित पूर्णवेळ ग्रंथपाल देण्यासंदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे तो मंजूर झाल्यानंतर पूर्णवेळ ग्रंथपाल उपलब्ध होऊ शकतील असं केसरकर यांनी सांगितलं.

याशिवाय, शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेत आहोत.
राज्यात येत्या शैक्षणिक वर्षांपासून डिजिटल ग्रंथालय उपक्रम सुरू केला जाणार आहे. वाचनासाठी डिजिटल पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येतील तसंच शाळांमधील कॉम्प्युटर लायब्ररीचा वापर वर्ग संपल्यानंतर डिजिटल ग्रंथालय म्हणून वापर करता येईल का हे पडताळून पाहिलं जाईल. यामुळे शालेय शिक्षणात गुणात्मक फरक पडेल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

इयत्ता सहावीपासून राज्यात कोडिंग शिकवण्याचं कामही सुरु झालं आहे, पुढच्या वर्षी या सर्व क्षेत्रात गुणात्मक फरक दिसून येईल असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *